नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसमुळे मृतांच्या संख्येत तर वाढ होतच आहे त्यासह आता भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 5194 वर पोहोचली आहे. 401 लोक कोरोनामुक्त झाले आहेत, त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा सध्याचा तसा आकडा पाहिला तर कोरोनामुक्त सोडून 4643 आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते 24 तासात 773 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत आणि 10 लोकांचा मागील 24 तासात मृत्यू झाला आहे.
#WATCH Live from Delhi – Union Ministry of Health & Family Welfare briefing on #COVID19 situation. (8th April 2020) https://t.co/HWxzrQ7ESu
— ANI (@ANI) April 8, 2020
कोरोना व्हायरसच्या चाचण्यांची देशात संख्या वाढली आहे. दिल्ली सरकारने घोषणा केली आहे की ते लवकरच दिवसाला 1 लाख लोकांंची चाचणी करण्याची योजना आखत आहेत. या दरम्यान दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी लोकांना विनंती केली की घराबाहेर पडू नका आणि आपल्या कुटूंबीच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करा. सर्वांना असे कृत्य टाळले पाहिजे की ज्यामुळे कोरोना पसरेल.
काही राज्यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या स्क्रीनिंगची योजना केली आहे. राज्य सरकार रात्रंदिवस कोरोनाचा सामना करण्यात व्यस्त आहे. अरुणाचल प्रदेशात 8 एप्रिलला सकाळी 7 वाजेपर्यंत 179 नमुने गोळा करण्यात आले. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सांगितले की यातील 159 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर 1 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या 19 नमुन्यांची चाचणी अद्याप प्रलंबित आहेत.
Till date total 402 people have been discharged, total 5194 positive confirmed case have been reported. In last one day 773 positive cases were reported. Total 149 deaths have been reported and around 32 people have died yesterday: Lav Aggarwal,Joint Secy,Health Ministry #COVID19 pic.twitter.com/JUaLNCT270
— ANI (@ANI) April 8, 2020
बिहारमध्ये आतापर्यंत कोरोनाची 38 रुग्ण समोर आले आहेत मंगळवारी सिवान आणि बेगुसरायमध्ये दोन कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. राजस्थानात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 348 झाली आहे. जयपूर, बांसवाडा आणि बिकानेरमधून 5 प्रकरणं समोर आली. हे सर्व लोक कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले होते.
महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावित –
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 पार झाला आहे. मुंबईत धारावीमध्ये 9 कोरोनाग्रस्त आढळले. राज्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1018 आहे तर मृतांची संख्या 64 आहे.