नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. या प्राणघातक व्हायरसमुळे चीनमध्ये एकूण २,२३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पीडितांची संख्या ७५ हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी हुबेईमध्ये ४१४ नवीन घटनांची नोंद झाली. एकट्या हुबेईतील मृतांची संख्या २,११४ वर पोहचली आहे. चीनी तुरूंगात कोरोना व्हायरसची ४०० पेक्षा जास्त प्रकरणे आढळली आहेत. प्रांतिक आरोग्य आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले की, पूर्व शेडोंग प्रांतातील रेनचेंग कारागृहात सात रक्षक आणि २०० कैद्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. या व्यतिरिक्त, पूर्व झेजियांग प्रांतातील शिलिफेंग कारागृहात ३४ प्रकरणांची पुष्टी झाली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता अमेरिकन एअरलाइन्सने चीन आणि हाँगकाँगमधून उद्भवणाऱ्या विमानांवरील बंदी २४ एप्रिलपर्यंत वाढविली आहे. तर एयर फ्रान्सने मार्चपर्यंत चीनकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानावर बंदी घातली आहे.
चीनबाहेर ९ लोकांचा मृत्यू
मध्य चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी वुहान शहरात डिसेंबरमध्ये कोरोना व्हायरसची पहिली घटना घडली होती. तेव्हापासून हा विषाणू वुहानपासून चीनसह जगातील २५ हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. चीनबाहेर कोरोना व्हायरसमुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात जपानमध्ये तीन, हाँगकाँगमधील दोन, इराणमध्ये दोन, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समधील प्रत्येकी एक मृत्यूची नोंद झाली आहे.
कोठे किती प्रकरणे ?
दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी पहाटेपर्यंत चीनच्या बाहेर रिपोर्ट केली गेलेली प्रकरणांची संख्या जापान (७२३), दक्षिण कोरिया (१५६), सिंगापुर (८५), हांगकांग (६९), थाईलैंड (३५), ताइवान (२४), मलेशिया ( २२), ऑस्ट्रेलिया (१७), जर्मनी (१६), वियतनाम (१६), अमेरिका (१५), फ्रांस (१२), मकाऊ (१०), यूके (९), यूएई (९), कनाडा (८) , ईरान (५), भारत (३), फिलीपींस (३), इटली (३), रूस (२), स्पेन (२), मिस्र (१), कंबोडिया (१), फिनलैंड (१), नेपाल (१), श्रीलंका (१), स्वीडन (१) और बेल्जियम (१).
मॉल आणि खरेदी केंद्रे बंद
कोरोना व्हायरसमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद दक्षिण कोरियामध्ये झाली आहे. या बातमीनंतर काही तासांनी दक्षिण कोरियाचे चौथे मोठे शहर डेगूच्या महापौरांनी रहिवाशांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले. डेगुमध्ये व्हायरसची ५३ प्रकरणे नोंदली गेली आहेत. शहरातील अनेक मॉल आणि शॉपिंग सेंटर रिकामी दिसली.