बहुजननामा ऑनलाईन टीम – भारतीय सैन्याला पुन्हा एकदा एक मोठा दहशतवादी कट हाणून पाडण्यात यश आले आहे. लष्कराच्या बॉम्ब शोधक पथकाने राष्ट्रीय महामार्ग ११ वरील खुदवानी पुलाजवळ बसविलेले २५ किलो सुधारित स्फोटक यंत्र (आयईडी) नष्ट केले. २१ नोव्हेंबरला सैन्याच्या दक्षता वाहिनीच्या तपासणीत महामार्गावर आयईडी असल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर तातडीने लष्कराच्या बॉम्ब पथकाला बोलविण्यात आले.
#UPDATE Indian Army: In a desperate attempt to inflict civilian casualties & terrorise the populace, terrorists planted an Improvised Explosive Device (IED) containing 25 kg of High Explosive on the NH-11 near Khudwani Bridge yesterday. (1/3) #JammuAndKashmir https://t.co/WCVd7Chm1v pic.twitter.com/nr3z5vThtr
— ANI (@ANI) November 22, 2019
धोका असतानाही बॉम्ब शोधक पथकाने जमिनीखाली दबलेले आयईडी बाहेर खेचले. हे बॉम्ब दहशतवाद्यांनी सिलिंडरच्या आकाराच्या दोन कंटेनरमध्ये ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार कंटेनरमध्ये १५ किलो स्फोटके होती तर दुसऱ्या ठिकाणी १० किलो स्फोटके होती. पथकाने त्याच ठिकाणी त्याचा नाश केला.
@ChinarcorpsIA #BOMB DISPOSAL TEAMS DIFFUSE 25kg #IED PLANTED ON #NH11 astride median near Khudwani Bridge. @adgpi
Watch @indiatvnews Exclusive pic.twitter.com/TLNDTpa1Uu— Manish Prasad (@manishindiatv) November 22, 2019
सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब वेळेवर नष्ट झाला नसता तर इथल्या जनजीवनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. या स्फोटातून खोऱ्यात वेगाने सुधारणारे वातावरण खराब करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न केला.