नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस लोकसभेत झालेल्या पराभवातून बाहेर पडत असून निवडणुकीनंतर राहुल गांधी नुकताच वायनाड दौरा केला आणि तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर त्यांनी आता उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि RSS वर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात राहुल गांधी आपल्या अधीकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले. त्यात ते म्हणतात की, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचे वागणे मूर्खपणाचे आहे “जर प्रत्येक पत्रकार जो माझ्याविरोधात खोटे आरोप करुन भाजपा आणि आएसएसचा अजेंडा चालवत असेल अशा पत्रकारांची तुरुंगवारी केल्यास माध्यमात काम करणारेलोक कमी होतील. तसेच अटक करण्यात आलेल्या पत्रकारांना सोडण्याची गरज असल्याचेही ते बोलले.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत्रकार प्रशांत कनौजिया यांची सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिले आहेत. प्रशांत कनौजिया यांनी ट्विटर आणि फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. प्रशांत कनौजिया यांनी हा व्हिडीओ शेअर करून मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत शुक्रवारी रात्री लखनऊमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हजरतगंज पोलिसांनी दिल्लीतून प्रशांत कनौजिया यांना अटक करण्यात आली होती.