नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – दोन दिवसांपूर्वी झालेल्या बस आणि रिक्षाच्या अपघातात अमोल अहिरे वाचला असून त्याच्या गर्भवती पत्नीचा त्या अपघातात मृत्यू झाला आहे. तर एकाच सीटवर बसलेल्या गर्भवती पत्नीच्या मृत्यूचा थरार पाहायला मिळेल, अशी कल्पनाही करू शकत नाही, अशी भावना अमोलने व्यक्त केली आहे.
अमोल अहिरे हा चिराई येथे सामाजिक कार्यकर्ता असून तो खासगी कंपनीच्या डिश टीव्हीच्या विक्रीचे कामकाज करतो. मागच्या आठ महिन्यांपूर्वी त्याचा विवाह शितलशी झाला असून लग्नानंतर शीतलला दिवस गेले. तर कुटुंबात नवीन पाहून येणार असल्याने आनंदाचे वातावरण होते. मंगळवारी झालेल्या वैद्यकीय तपासणीसाठी ते दोघे सोबतच गेले होते. तपासणी झाल्यावर बाळाची प्रकृती, शरीरातील पाणी, बाळाचे ठोके, रक्ताचे प्रमाण चांगले आहे, असे समजल्यावर ते दोघेही अत्यंत आनंदी होते.
मालेगाववरून धुळे – कळवण बसमध्ये दोघेही एकाच सीटवर बसले होते. नंतर मेशी गावाजवळ आल्यावर अचानक बसचा अपघात झाला. बस विहरीत पडल्याने गर्भवती शीतलचा मृत्यू झाला असून बुधवारी शोकाकुल वातावरणात मृत शीतलवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.