Nashik Crime | संतापजनक ! लहान मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून महिलेवर बलात्कार; महाराष्ट्रातील खळबळजनक घटना

नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – Nashik Crime | नाशिकमध्ये एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना (Nashik Crime) उघडकीस आली आहे. येथील लहान मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला ठार मारण्याची धमकी देत एका महिलेवर बलात्कार (Rape in Nashik) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील सातपूर पोलिसांनी (satpur police station) आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी, आजाद शेख (Azad Shaikh) असं आरोपीचं नाव आहे. आरोपी आजादने सतत महिलेला धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. तर, आरोपीने त्र्यंबकेश्वरच्या एका लॉजमध्ये 17 डिसेंबरला पूर्ण रात्र बलात्कार केला. जेव्हा पीडितेने आरोपीच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिच्या छोट्या मुलीच्या गळ्यावर चाकू (Nashik Crime) ठेवला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याचप्रकारे त्याने धमकी देत पीडित महिलेवर विविध ठिकाणी अनेकदा बलात्कार केले. अशी तक्रार महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, यानंतर आरोपी नाशिकमधून पळण्याचा प्रयत्न करत रेल्वे स्टेशनला पोहचला होता आणि बाहेर जाणाऱ्या गाडीची वाट पाहत होता, पण पोलिसांना याबाबत माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन गाठलं. आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, पिडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी आजाद शेख वर कलम 376 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी अधित तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव (PSI Shyam Jadhav) करीत आहेत.
Web Title :- Nashik Crime | woman raped putting knife on her girl neck satpur police station nashik maharashtra incident.
Beed Crime | दुर्देवी ! जेवण करून घराबाहेर फिरत असताना भरधाव जीपने 2 सख्ख्या बहिणींना चिरडलं
Comments are closed.