नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – Nashik Crime | नाशिक (Nashik) शहरातील वडाळा नाका (Wadala Naka) ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. त्या परिसरात दोघा भावांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आरोपींनी चिकनच्या दुकानातील कोयत्यानं दोघा भावांवर भररस्त्यात सपासप वार केले आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या थरार हल्याप्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा थरार CCTV मध्ये कैद झाला असून सर्वत्र प्रसारित (Nashik Crime) होत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी, अमीर खान (Aamir Khan) आणि मझर खान (Mazar Khan) असे हल्ला झालेल्या दोघां भावांची नावे असून दोघांनाही स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याठिकाणी दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद होऊन मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतरही पोलिसांनी कारवाई करण्यात विलंब लावला आहे. म्हणून परिसरातील दुकानदारांकडून संतापाची भावना व्यक्त केली जाते.
नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात दोघा भावांवर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला केला आहे. pic.twitter.com/IPdO34DO9v
— The मराठी Medium (@MarathiMedium) July 26, 2021
काय आहे प्रकरण ?
नाशिक येथील वडाळा नाका परिसरात पीडित भावांचं आणि आरोपीचं चिकनचं दुकान (Chicken shop) आहे. तर, जखमी भाऊ अमीर खान आणि मझर खान यांनी संबंधित चिकन दुकानदाराची तक्रार पोलिसांत (Police) केली होती. पोलिसांत तक्रार दिल्याने आरोपींनी दुकानासमोर येऊन याबाबत जाब विचारायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्यात वाद निर्माण झाला. यावरून वाद वाढला. आरोपीने रागाच्या भरात दोघा भावांवर चिकनच्या दुकानातील कोयत्यानं सपासप वार केला. या हल्ल्यामध्ये दोन्ही भावंड रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
या दरम्यान, आरोपींनी हल्ला केल्यानंतर तेथून पसार झाले. यानंतर तेथील स्थनिकांनी जखमी
भावांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवले. भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे रस्त्यावर
अनेक नागरिकांनी घटना बघण्यासाठी गर्दी केली होती. या घटनेनंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी रक्त सांडलं होतं.
Web Title : pune crime youth girl beaten four people due dog barking mother incidents kothrud
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी मोठी भरती; आजच करा अर्ज