Nashik Crime | भाजपा मंडल अध्यक्षाची सपासप वार करुन हत्या; प्रचंड खळबळ

नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – Nashik Crime | येथील सातपूर भाजपा (BJP) मंडल अध्यक्षावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. युनियनच्या वादातून ही हत्या (Nashik Crime) झाल्याचे सांगितले जात आहे.
अमोल इघे असे हत्या (Murder) झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. अमोल इघे (Amol Eghe) हे भाजपा सातपूर मंडल अध्यक्ष होते. अमोल यांना सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. त्यानंतर ते सातपूर एमआयडीसीमधील कार्बन नाका परिसरात आले. तेथे त्यांच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांना शासकीय हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत (Nashik Crime) घोषित केले. युनियनच्या वादातून त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गेल्या ५ दिवसात नाशिक शहरात हत्येची ही तिसरी घटना आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला आरपीआयच्या महिला पदाधिकारी पूजा आंबेकर (Pooja Ambekar) यांची हत्या करण्यात आली होती.
Web Title :- Nashik Crime | nashik bjp leader amol eghe murder.
Comments are closed.