नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – Nashik Crime | नाशिकच्या सिडको (CIDCO) परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरुन पडून एका 18 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना सिडको परिसरातील पवन नगर येथील ज्योती अपार्टमेंटमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चिमुकलीच्या मृत्यूमुळे तिच्या आई – वडिलांवर मोठा आघात (Nashik Crime) झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती अपार्टमेंट मध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या राहुल खैरनार यांची 18 महिन्याची मुलगी समृद्धी (Samriddhi Rahul Khairnar) ही घरात खेळत होती. खेळता खेळता ती बाल्कनीत (Balcony) गेली व तीचा तोल जाऊन खाली पडली. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खैरनार परिवारावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. (Nashik Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिचे आई – वडील घरी नव्हते, असे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे ती पडल्यानंतर तिला तात्काळ उपचार मिळाले असते तर चिमुकलीचा जीव वाचला असता असे बोलले जात आहे.
18 महिन्याच्या समृद्धीच्या मृत्यूने लहान मुलांना एकटे बाल्कनीत सोडल्याने एका निष्पाप जीवाला मुकावे लागल्याने शेजाऱ्यांचेही मन हेलावले आहे.
Web Title : – Nashik Crime | 18 months of prosperity fell to his death while playing on the balcony nashik crime
हे देखील वाचा :
MNS Leader Shalini Thackeray | ‘महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य’ – मनसे नेत्या शालिनी ठाकरे