नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – Nashik Accident News | राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये खासगी बसचा टायर फुटून अपघात झाला आहे. देवदर्शनाहून परतताना हा अपघात घडला आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील बेलगाव ढगा परिसरात हा अपघात झाला आहे. (Nashik Accident News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला
हि खासगी वाहतूक करणारी बस प्रवाशांना घेऊन त्र्यंबकेश्वरहुन देवदर्शन करून पुन्हा नाशिकच्या दिशेने निघाली होती. यादरम्यान हि बस बेलगाव ढगा फाट्याजवळील एस्पालिअर स्कुल जवळ आली असताना या बसचा टायर फुटला. यामुळे बस अनियंत्रित झाल्यामुळे बस थेट डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. यामुळे या बसने नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली आणि झाडावर जाऊन आदळली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाली आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Nashik Accident News)
दोन दिवसांपूर्वी झाला होता भीषण अपघात
दोन दिवसांपूर्वी वणी सापुतारा मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील
तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये एका आठ महिन्याच्या चिमुरडीचा समावेश आहे.
या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title : Nashik Accident News | nashik accident in belgaum dhaga area on nashik trimbakeshwar road bus broke divider and hit bike
हे देखील वाचा :
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Raigad Crime News | कर्जबाजारीपणाला कंटाळून शिक्षकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या