नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – Nashik Accident News | नाशिक रोड – जेल रोड या ठिकाणच्या पवारवाडी या ठिकाणी स्कूल व्हॅनच्या धडकेत 8 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपेक्षा नवज्योत भालेराव (रा. पवारवाडी, हरिओम दर्शन सोसायटी समोर, जेलरोड, नाशिकरोड) असे अपघातात (Nashik Accident News) मृत पावलेल्या 8 वर्षीय मुलीचे नाव आहे.
काय घडले नेमके?
अपेक्षा हिला नवीन मराठी शाळेची स्कूल व्हॅन घरी सोडवण्यासाठी आली होती. यानंतर स्कूल व्हॅन मधून खाली उतरल्यानंतर अपेक्षा व्हॅनच्या पाठीमागून घरी जात होती. यादरम्यान व्हॅन चालकाने अचानक गाडी रिव्हर्स मागे घेतली. त्यामुळे अपेक्षाला जोरदार धडक बसली आणि ती स्कूल व्हॅनच्या मागच्या टायरखाली आली आणि गंभीर जखमी झाली. (Nashik Accident News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हि गोष्ट लक्षात येताच अपेक्षाला तातडीने उपचारासाठी जयराम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टर सुनील मोकासरे यांनी अपेक्षाला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 वर्षीय अपेक्षाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title :- Nashik Accident News | 8 year old girl died accident in nashik
हे देखील वाचा :
Hrithik Roshan Saba Azad | हृतिक-सबाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला? राकेश रोशन यांनी दिली ‘ही’ माहिती
Sheezan Khan | अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर; शिझान खानला जामीन मंजूर