बहुजननामा ऑनलाईन – भारताच्या चंद्रयान 2 च्या विक्रम लॅंडरशी संपर्क साधण्याची मुदत संपत आली असताना नासाच्या मून आर्बिटरने संपर्क तुटलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लॅंडरचे चंद्राच्या पृष्ठभागावरील काही फोटो काढले आहेत. नासाच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या वृत्तानुसार, नासाने आपल्या चंद्र रेकोनाइझन्स ऑर्बिटर (एलआरओ) च्या मदतीने १७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अनेक छायाचित्रे काढली. नासा सध्या या फोटोंचे विश्लेषण करीत आहे. याच भागात चंद्रयान -२ मोहिमेंतर्गत विक्रम लँडरची सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु जमीनीच्या दोन किलोमीटर अंतरावर विक्रम लॅंडरचा इस्रोशी संपर्क तुटला. विक्रम लॅंडरशी संपर्क साधण्यासाठी आता फक्त २१ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागातील पृष्ठभुमीवरील त्या भागात अंधार होईल. एलआरओ ऑर्बिटरच्या या कॅमेर्याने हे फोटो काढले असल्याची पुष्टी एलआलओचे उप प्रकल्प वैज्ञानिक जॉन केलर यांनी दिली आहे. ते म्हणाले, एलआरओ टीम या फोटोंची जुन्या छायाचित्रांशी तुलना करेल आणि लँडर दिसत आहे की नाही हे त्यांचे विश्लेषण करेल. ऑर्बिटर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरुन जात असताना ही छायाचित्रे घेण्यात आली. त्यावेळी तिथे अंधार पडण्यास सुरवात झाली. हे चित्र अस्पष्ट असेल हे स्पष्ट आहे.
भारतीय अंतराळ संस्था इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांना चंद्र पृष्ठभाग पोहचल्यानंतर फक्त १४ दिवस काम करावे लागणार आहे. त्याचे वय चंद्राच्या एका दिवसाइतके होते, जे पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचे आहे. विक्रम लँडर जेथे उतरणार होता त्या भागात सध्या संध्याकाळ आहे. त्याभागावर २१ सप्टेंबरनंतर सूर्योदय होणार नाही. रात्री चंद्र खूप थंड असतो. रात्रीच्या वेळी या भागाचे तापमान वजा २०० डिग्री सेल्सियस पर्यंत कमी होऊ शकते. विक्रम लॅंडरचे इलेक्ट्रॉनिक भाग या तापमानात टिकून राहण्यासाठी सक्षम नाहीत. म्हणूनच, जर दुसर्या दिवसापर्यंत विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही तर त्याची संपर्कात येण्याच्या सर्व शक्यता कायमच्या संपुष्टात येतील. इस्रोने ७ सप्टेंबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास विक्रम लँडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु अपेक्षेनुसार हे लँडिंग होऊ शकले नाही आणि विक्रमचा संपर्क तुटला. इस्रो लवकरच चंद्रावरील घेतलेली काही छायाचित्रे प्रसिद्ध करेल.