वृत्तसंस्था – अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासा पुढील वर्षभरात जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप(JWST) ला लॉंच करण्याची योजना आखात आहे. ज्यामुळे दूर अवकाशातील जीवनाची शक्यता शोधून काढेल. नेक्स्ट वेबच्या आहवलात असा दावा केला आहे. तेच याला घेऊन अमेरिकेच्या एका वरिष्ठ वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले की अवकाशात एलियनशी संपर्क केला नाही पाहिजे. त्यांनी याला एक भयानक विचार आहे असे बोलत ते म्हणाले की, त्यांच्याशी संपर्क करण्याचा अर्थ त्यांना पृथ्वीवर राज्य करण्यासाठी आमंत्रित करणे होय.
हबलपेक्षा १०० पट अधिक मजबूत असेल नवीन दुर्बीण
सध्या अंतराळात कार्यरत हबल टेलिस्कोप ची ताकद नवीन जॅम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या समोर काहीच नाही. यामुळे अवकाशात मनुष्याची पोहोच बरीच दूर जाईल. या दुर्बिणीच्या सहायाने वैज्ञानिक कोट्यवधी किलोमीटर दूर पाहू शकतील. तथापि, अनेक वैज्ञानिकांनी या दुर्बिणीबद्दल भीतीही व्यक्त केली आहे.
नासाच्या नवीन दुर्बिणीमुळे वैज्ञानिकांमध्ये भीती
नासाच्या या शक्तिशाली दुर्बिणीमुळे काही वैज्ञानिकांमध्ये भीती आहे की हे अवकाशातील एलियनला त्रास देऊ शकते. त्यांना अजूनही आपल्या स्तित्वाबद्दल जाणीव नाही आहे आणि बहुदा पृथ्वीशी ते जुळवून घेणार नाहीत. स्ट्रिंग थियरीस्ट मिचियोकाकू यांनी प्रेक्षकांशी बोलताना सांगितले की, नवीन टेलिस्कोप लोकांना हजार ग्रह पाहण्यासाठी शक्ती देईल, परंतू आपण तेथे राहणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विचार केला पाहिजे.
काकू म्हणाले की लवकरच जेम्स वेब दुर्बीण आपल्या पृथ्वीच्या कक्षेत असेल आणि आपल्याला हजारो ग्रह पहायला मिळतील. त्यामुळे मला असे वाटत, याची शक्यता अधिक आहे की आपण एका विदेशी संस्कृतीशी संपर्क साधू शकतो. माझे काही सहकारी आहेत, जे हे मानतात की, आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. मला वाटते की हा एक भयानक विचार आहे. नासाची ही नवीन दुर्बीण पृथ्वीपासून जवळजवळ १.५ मिलियन किलोमीटर दूर पृथ्वीची परिक्रमा करेल.
या दुर्बिलीना मे २०२२ पर्यंत लॉंच करेल अमेरिका
या दुर्बिणीला मे २०२२ पर्यंत लॉंच करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. ही हबलपासून १०० पट जास्त शक्तिशाली असेल आणि अंतराळात जीवांच्या चिन्हांसाठी हजारो संभाव्य ग्रह स्कॅन करेल. हे नासाच्या संशोधकांना विश्वास मूळ पाहण्यास आणि ग्रह शोधण्यात सक्षम असेल.