नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून करण्यासाठी शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर अनेक शिवसैनिक हजेरी लावत आहेत. तसेच अनेक राजकीय नेतेही त्यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. मोदी यांनी महान बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. धैर्यवान आणि दुर्दम्य साहस असलेल्या बाळासाहेबांनी लोककल्याणाचे प्रश्न उपस्थित करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. त्यांना नेहमीच भारतीय नीतिनियम आणि मूल्ये यांचा अभिमान होता. ते लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत, असे ट्विट करत अभिवादन केले.
Tributes to the great Balasaheb Thackeray on his Jayanti. Courageous and indomitable, he never hesitated from raising issues of public welfare. He always remained proud of Indian ethos and values. He continues to inspire millions.
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2020
तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर पूर्ण हिंदुस्थानात ज्यांनी हिंदुत्वाची ज्योत पेटवली. आणि आपल्या सगळ्यांना आज देखील त्यांच्यापासून ऊर्जा प्राप्त होते. मी हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना अर्पण करतो, असे ट्विट करत फडणवीसांनी आदरांजली वाहिली.
कठोर अन् प्रेमळ…
प्रेरणादायी अन् उर्जावान…
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव मार्गदर्शन करीत राहतील…#HinduHrudaySamrat #BalasahebThackeray pic.twitter.com/zvSKRzyn82— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2020
बाळासाहेब हे ऊर्जेचा स्रोत होते. प्रत्येक छोट्या माणसाला फक्त बाळासाहेब यांच्या विचारांनी ऊर्जा मिळायची. अनेक लोकांनी बाळासाहेब यांना फक्त टीव्हीवर पहिले असून अनेकांना त्यांना भेटण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. पण तरीही अशा लोकांना एक वाक्य आणि शब्दांनी प्रेरित करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती. तसेच वज्रापेक्षा कडक भूमिका मांडणारे बाळासाहेब ठाकरे होते तर दुसरीकडे प्रेम करणारेदेखील बाळासाहेब होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीला असे वाटेल की, प्रेरणा कोणाकडून घ्यावी ! तेव्हा बाळासाहेबांची आठवण त्या प्रत्येक व्यक्तीला प्रकर्षाने येत आहे. बाळासाहेब यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत राहो, अशा भावनाही फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
Visit : bahujannama.com