Narendra Modi Oath Ceremony | नरेंद्र मोदी ९ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार!

दिल्ली: Narendra Modi Oath Oath Ceremony | लोकसभा निवडणूक निकालामध्ये (Lok Sabha Election Results 2024) एनडीए (NDA) ने इतर मित्रपक्षांना एकत्र करून बहुमत मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी यांची एनडीएने नेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आता मोदींच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची (Prime Minister) शपथ येत्या ९ जून रोजी घेणार आहेत.

९ जूनला संध्याकाळी ६ वाजता हा शपधविधी होत आहे. दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला, त्याला गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah), नितीन गडकरी (Nitin Gadkari), चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) , कुमारस्वामी (Kumaraswamy), नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अनुमोदन केले.

नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी एनडीएतील प्रमुख नेत्यांनी त्यांच्या नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. आंध्र प्रदेशचे नेते तथा टीडीएस पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनीदेखील मोदी यांच्या नावाला पाठिंबा दिला.

नरेंद्र मोदी यांच्याकडे दूरदृष्टी आहे. आज भारताला योग्य वेळेला योग्य नेता मिळत आहे. भारतासाठी ही मोठी संधी आहे. ही संधी गमावल्यास ती पुन्हा येणार नाही. जगातील इतर देशांचा वृद्धी दर हा दोन ते तीन टक्के आहे. पण गेल्या दहा वर्षांपासून आपल्या देशाचा वृद्धीदर मोठा आहे, असे चंद्राबाबू म्हणाले.