मुन्नार : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १५ लाख रुपये खात्यात जमा करण्याचे वक्तव्य हा केवळ एक जुमला असल्याचे सांगितले गेले असले तरी लोकांनाच अजून त्यावर विश्वास आहे. कारण असाच एक प्रकार केरळमध्ये घडला. नरेंद्र मोदी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार आहेत. असा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि त्यानंतर अक्षरश: बँकांसमोर नागरिकांनी सकाळी रांगा लावल्या.
हा प्रकार घडला आहे केरळच्या मुन्नार येथे. मुन्नार हे केरळमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून तेथे चहाचे मळे आहेत. .या चहाच्या मळ्यांमधील कामगारांना हा सोशल मिडीयावरील मेसेज व्हायरल झाल्यानंतर त्यावर त्यांचा विश्वास बसला आणि त्यानंतर त्यांनी पोस्टल बँकेसमोर खाते उघडण्यासाठी रांगा लावल्या. मुळात ही अफवा होती.
चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी पोस्टाच्या बँकेबाहेर रांगा लावल्या होत्या. मुन्नारच्या एकट्या पोस्टल बँकेत ३ दिवसांत तब्बल १०५० खाती उघडली गेली. तर सरकार बेघरांसाठी घकुल आणि जमी देण्याची योजना करत आहे. असा मेसेज व्हायरल झाल्यानंतरही देवीकुलमच्या आरडीओ कार्यालयाबाहेरदेखील अशीच गर्दी पाहावयास मिळाली.