पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – अनेक वर्षांपासून सुरु असलेले पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Nashik National Highway) काम आता पूर्ण झाले आहे. याबाबत माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी दिली आहे. पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव येथील बायपासचे (narayangaon bypass) काम पूर्ण झाल्याने आता वाहतुक जाण्यायेण्यास सोईस्कर झाली आहे. तसेच हा प्रवास वेगवान देखील होणार आहे. तर कृषी उत्पादने मुंबई-पुणे मार्केटमध्ये (Mumbai-Pune Market) सहज पोहोचतील, असं म्हणत नितीन गडकरी यांनी नारायणगाव येथील बायपासचे (narayangaon bypass) काम पूर्ण झालेले फोटो देखील ट्विटच्या माध्यमातून पोस्ट केले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
The Narayangaon, Pune bypass will ease travel between Pune and Nashik. Agricultural products would reach Mumbai-Pune Market easily. #PragatiKaHighway pic.twitter.com/3LMVQZZYkA
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 16, 2021
पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव येथील बायपासचे काम गेली 5 वर्षांपासून सुरु होतं. 5 किलोमीटर लांब आणि 60 मीटर रुंदीच्या बाह्यवळण रस्त्याचे काम 2018 रोजी भूसंपादनाच्या कारणामुळे रखडले होते. यांनतर आता या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झालं आहे. यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडीतून आता नागरिकांची सुटका झाली आहे. म्हणून आता पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास (Travel) वेगवान होणार आहे.
Web Title : Narayangaon Bypass | narayangaon bypass work completed pune nashik pune journey will be faster nitin gadkari
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !
Mumbai |DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’
Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये