मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते (BJP Leader) नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई महापालिकेने Brihanmumbai Municipal Corporation (BMC) दुसऱ्यांदा नोटीस (Notice) पाठवली आहे. नारायण राणेंचा मुंबईत (Mumbai) जुहूमध्ये (Juhu) एक बंगला असुन त्यामध्ये अनधिकृत बांधकाम (Unauthorized Construction) झाल्याची तक्रार राणेंविरोधात करण्यात आली. महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी राणे आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) वाद पेटलेला दिसत आहे. महापालिकेच्या नोटीसनंतर नारायण राणेंनी (Narayan Rane) उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे.
नारायण राणे (Narayan Rane) यांनी ही कारवाई थांबवण्यासाठी हायकोर्टात याचिका (Petition In Mumbai High Court) दाखल केली आहे. या याचिकेवर उद्याच म्हणजेच मंगळवारी सुनावणी होणार आहे. 15 दिवसात तुम्ही स्वत: घर पाडणे नाहीतर कारवाई करावी लागेल, अशी नोटीस बजावण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अशीच नोटीस (Notice) पाठवण्यात आली आहे.
जुहू येथे नारायण राणेंचा ‘अधिश’ (Adhish) नावाचा बंगला आहे.
मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार बीएमसीने (BMC) राणेंना ही नोटीस पाठवली आहे. याआधी राणेंना, 15 दिवसात तुम्ही स्वत: घर पाडणे नाहीतर कारवाई करावी लागेल, अशीच नोटीस पुन्हा एकदा महापालिकेडून पाठवण्यात आली आहे. दरम्यान, नारायण राणेंनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता कोर्टाचा (Bombay High Court) निर्णय काय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Web Title :- Narayan Rane | Union minister and bjp leader narayan rane will run in the high court to avoid action on the adhish bungalow
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Indian Railways | एका महिन्यात एका IRCTC यूजर आयडीवरून बुक करू शकता 12 तिकिट, जाणून घ्या प्रोसेस
Multibagger Stocks | 4 रुपयांच्या शेअरची दररोज वाढत आहे खरेदी, 52 आठवड्यांची सर्वोत्तम कामगिरी