शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी थेट शरद पवार यांना धमकी दिली आहे. माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठिण होईल अशी धमकी त्यांनी पवारांना दिली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आणखी काही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.
माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 23, 2022
नारायण राणे यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, सन्माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे माझे जुने सहकारी व मित्रही आहेत. ते व त्यांचे सहकारी सरकारमधून बाहेर पडून राज्याबाहेर आहेत. त्यांची संख्या पाहता आताच्या मुख्यमंत्र्यांनी (CM) शोभायात्रा काढली, हा पळपुटेपणा व स्वार्थीपणा आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली.
सन्माननीय नगरविकास मंत्री श्री @mieknathshinde हे माझे जुने सहकारी व मित्रही आहेत, ते व त्यांचे सहकारी सरकारमधून बाहेर पडून राज्याबाहेर आहेत. त्यांची संख्या पाहता आताच्या मुख्यमंत्र्यांनी शोभायात्रा काढली, हा पळपुटेपणा व स्वार्थीपणा आहे. @BJP4Maharashtra
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 23, 2022
Web Title :- Narayan Rane | BJP leader and union minister narayan ranes threat to ncp chief sharad pawar