नंदुरबार : बहुजननामा ऑनलाइन – Nandurbar Police | महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलामध्ये पुरुषांप्रमाणेच महिला (Lady police) देखील 24 तास कर्तव्य पार पाडत असतात. कर्तव्य करताना महिलांना कोणतीही अडचण येवू नये व कामातून थोडा विसावा (Rest) मिळावा यासाठी नंदुरबार पोलीस दलातील (Nandurbar Police) नवापुर पोलीस ठाण्यात (Navapur Police Station) महिला विश्रामगृह (Women’s Rest House) तयार करण्यात आले आहे. या विश्राम गृहाचे उद्घाटन (Inauguration) नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (Special Inspector General of Police of Nashik Range) यांच्या पत्नी डॉ. विद्युलता शेखर पाटील (Dr. Vidyulata Shekhar Patil) व नवापुर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष हेमलता पाटील (Navapur Municipality Mayor Hemalatha Patil) यांच्या हस्ते सोमवारी (दि. 21) करण्यात आले.
पोलीस दलात कर्तव्य करताना महिलांना कुठलीही अडचण येवू नये व कामात थोडा विसावा तसेच स्तनदा महिला अंमलदारांना यांना कर्तव्य करीत असतांना घरी जावून बाळाला स्तनपान (Breastfeeding) करण्यासाठी घरी जाणे शक्य नसते. अशा महिला अंमलदारांसाठी पोलीस ठाण्यातच महिला विश्रांती गृह हे सोयीचे होते. त्यामुळे महिला अंमलदारांना पोलीस ठाण्यातच महिला विश्राम गृह निर्माण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून (Government of Maharashtra) सांगण्यात आले होते. जेणेकरुन महिला अंमलदार मुल व नोकरी या दोन्हींकडे सारखे लक्ष ठेवून आपले कर्तव्य करतील.
शासनाच्या या सूचनेप्रमाणे नंदुरबार पोलीस दलातील (Nandurbar Police) नवापूर पोलीस ठाण्यात महिला विश्रांती गृह स्थापन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक बी.जी. शेखर पाटील (B.G. Shekhar Patil) यांनी महिला विश्राम गृहात बालकांसाठी खेळणी व उपयोगी साहित्य उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. तसेच महिलांनी महिला विश्राम गृहाचा उपयोग करुन याठिकाणी विसावा करीत असताना वाचनालयातील (Library) पुस्तकांचा वाचनासाठी उपयोग करावा असे सांगितले.
यावेळी पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक बी.जी. शेखर पाटील, डॉ. विद्युलता शेखर पाटील, नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil), अपर पोलीस अधीक्षक विजय पवार(Addl SP Vijay Pawar), उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Sub Divisional Police Officer Sachin Hiray), नगराध्यक्ष हेमलता पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (Local Crime Branch Police Inspector Ravindra Kalamkar), नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर (Police Inspector Balasaheb Bhapkar) यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Web Title :- Nandurbar Police | Inauguration of Women’s Rest House at Navapur Police Station, Nandurbar Police
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update