Nandurbar Police | महिला दिनानिमित्त नंदुरबार महिला पोलिसांची बाईक रॅली

नंदुरबार : बहुजननामा ऑनलाइन – महिला दिनाचे (International Women’s Day) औचित्य साधून नंदुरबार पोलीसांनी (Nandurbar Police ) महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची बाईक रॅली (Bike Rally) आयोजित केली होती. सुमारे 125 महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यात सहभागी झाले होते. या निमित्ताने कित्येक महिला पोलीस बुलेटवर (Bullet) स्वार झालेल्या होत्या. नंदुरबारचे पोलीस (Nandurbar Police) अधीक्षक पी.आर.पाटील (SP P.R. Patil) यांच्या संकल्पनेतून या वेगळ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांना सन्मान मिळण्याबरोबरच हेल्मेट (Helmet) वापराबाबत जागृती (Awareness) करण्याच्या निमित्ताने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबारच्या (Nandurbar Police) रस्त्यावर महिला पोलिसांची अशा प्रकारची बाईक रॅली पहिल्यांदाच निघाल्याने रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. या रॅलीला नागरिकांनीही जोरदार प्रतिसाद देत घरांच्या गच्ची व गॅलरीतून महिला पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला. जागोजागी लोक या वेगळ्या रॅलीचे चित्रिकरण आपल्या मोबाईलमध्ये करताना दिसून येत होते.
स्वतः पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (Superintendent of Police P.R. Patil), अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar) या बाईक रॅलीत सहभागी झाले होते.
Web Title :- Nandurbar Police | Bike rally of Nandurbar lady police officer on the occasion of international Women’s Day
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
7th Pay Commission | पेन्शन-DR वर मोदी सरकारने 4 वर्षांसाठी दाखवला हिरवा झेंडा, ‘या’ लोकांना फायदा
Comments are closed.