Nanded Lok Sabha By Election | विधानसभेबरोबरच लोकसभा पोटनिवडणूकीच्या तारखा निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता
मुंबई : Nanded Lok Sabha By Election | केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान यामध्ये नांदेडच्या पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण आणि भाजपच्या मोठ्या ताकदीला धक्का देत विजय खेचून आणणारे काँग्रेसचे नेते वसंतराव चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी अकाली निधन झाले होते.
खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात नजीकच्या काळात होणाऱ्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी, असा ठराव नांदेड जिल्हा व महानगर काँग्रेसच्या तीन शाखांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता. भाजपमधून नांदेडच्या लोकसभा पोट निवडणुकीसाठी काही नावे समोर येत असून नक्की कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान आज होणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभेबरोबरच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची आजच घोषणा होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Comments are closed.