नायगाव : बहुजननामा ऑनलाईन – उपेक्षित, शोषित, कष्टकरी ,शेतकरी, बहुजनांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी नायगाव तालुका अध्यक्ष पदाची निवडीसाठी मुलाखती दि-११ ऑक्टोबर २०२० रोज रविवार वेळ-सकाळी ११:०० वाजता स्थळ-ओमकार लॉजिग,महात्मा बसवेश्वर,नायगाव (बा.) येथे संपन्न झाल्या.
यावेळी नायगाव तालुक्यातुन मा.सुर्यकांत सोनकांबळे,अविनाश अनेराये, दिगांबर ढवळे,सतिष वाघमारे, दिपक गजभारे, केरबा रावते, साहेबराव डोईवाड, प्रकाश हनणंते,व इतर नायगाव तालूका व परिसरातील इच्छुकानी मुलाखत दिली. श्रद्धेय अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष शिवकुमार नरंगले, महासचिव श्याम कांबळे यांनी इच्छुकांची मुलाखत घेतली या इच्छुकातून लवकरच तालुकाध्यक्ष यांची निवड करण्यात येईन असी माहिती मा. जिल्हाध्यक्ष शिवकुमार नरगंले यांनी दिली..