Nana Patole On Porsche Car Accident Pune | डॉक्टर,पोलीस व राजकीय नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्त्न केला जातोय, नाना पटोलेंचा आरोप

May 30, 2024

पुणे: Nana Patole On Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून (Kalyani Nagar Accident) काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. नाना पटोले यांची मुंबईतील टिळक भवनामधील (Tilak Bhavan Mumbai) पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. या प्रकरणात डॉक्टरांच्या चौकशीसाठी नेमलेली एसआयटी समिती म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

या एसआयटी प्रकरणातील अध्यक्ष डॉ. सापळे (Dr Pallavi Saple) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत डॉ.सापळे भाड्याची गाडी वापरतात आणि महिन्याला त्याचे एक लाख रुपयांचे बिल शासनाला सादर करत असल्याचे नाना पटोलेंनी सांगितले.

“पुणे अपघात प्रकरणी कोणत्या मंत्र्याने फोन केले, त्या गाडीत कोण कोण होते, त्यांची नावे का पुढे येत नाहीत? सरकार लपवालपवी कशासाठी करत आहे? ज्या पबमधून ही मुले निघाली त्यावेळी दोन गाड्या होत्या, त्यांनी गाड्यांची रेस लावली होती व त्यातूनच हा अपघात झाला व दोघांना चिरडले.

ससून हॉस्पिटमधील (Sassoon Hospital) डॉ. तावरे (Dr Ajay Taware) यांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले यासाठी डॉ. तावरेंना कोणी फोन केला होता ? गाडी का बदलण्यात आली ? त्या पबमध्ये एका आमदाराचा मुलगाही होता, तो कोण ? हे राज्य सरकारने स्पष्ट केले पाहिजे.

अपघाताच्या वेळी आरोपी आणि आमदाराच्या मुलामध्ये गाडीची रेस लागली होती आणि त्यातून ही घटना घडली असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. डॉक्टर , पोलीस व राजकीय नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्त्न केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.