नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Nana Patole | नागपूर पदवीधर मतदार संघाचा धक्कदायक निकालानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकडे (Nagpur Teachers Constituency Election). ही जागा महाविकास आघाडीतील शिवसेनेला (Shivsena) सोडण्यात आली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार, असा विश्वास काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काँग्रेसमध्ये कुणाचीही आणि काशाचीही नाराजी नाही. काँग्रेसमध्ये गोंधळ सुरु आहे, असे जे विरोधक बोलत आहेत, तो कुठे आहे दाखवा, असे आव्हानच नाना पटोले यांनी दिले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) शिंदे गटाला एकही जागा दिलेली नाही, हे अपेक्षितच होते. ते सत्तेत सोबत असूनही एकत्र नाहीत. पण महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून आम्ही एक आहोत आणि पुढे जातोय, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.
दरम्यान, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवर जाहीर करण्यासाठी मंगळवार पर्य़ंत
भाजप आणि काँग्रेसचे पहिले आप पहिले आप सुरु होते.
मात्र बुधवारी सकाळी भाजपकडून शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून नागो गाणार (Nago Ganar) यांच्या
नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
Web Title :- Nana Patole | bjp did not give a single seat to shinde group nana patole
हे देखील वाचा :
Devendra Fadanvis | नाशिक पदवीधर निवडणूकीत देवेंद्र फडणवीस यांनीच केला काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम?
Supriya Sule | मंत्रीमंडळ विस्तारावरून सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले; म्हणाल्या…