बुलडाणा : बहुजननामा ऑनलाइन – युपी राज्यातील जिल्ह्यांची नामांतरण झाल्यानंतर जिल्ह्यांच्या नामांतरणाचे खुळ महाराष्ट्र राज्यातही आले आहे. बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करा अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
येत्या १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. दरम्यान सरकारने बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर असे करावे अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर नामकरण न केल्यास मोठे आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला.
याचबरोबर आम्ही मंत्रीपदाची वेळोवेळी मागणी करून देखील सरकारने दुर्लक्ष केल्याने सरकार विरोधात आमची नाराजी आहे असेही ते म्हंटले. याचबरोबर पक्षात मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीमुळे नाराज असलेल शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्ही महायुतीमध्ये आलो. परंतु गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये योग्य वागणूक मिळते असेही त्यांनी म्हंटले.