नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – Nagpur ZP Election | नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मंगळवारी (5 ऑक्टोबर) रोजी मतदान झाले. आज (बुधवारी) निवडणुकीचा निकाल (Nagpur ZP Election) सुरु होता. नागपूर याठिकाणी सर्व जागेचे निकाल हाती आलेत. यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे केंद्रिय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जिल्ह्यात भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. त्याठिकाणी काॅग्रेसनं आपलं वर्चस्व राखलं आहे.
नागपुर जिल्ह्यात काॅग्रेस (Congress) पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या 16 आणि काॅग्रेसच्या 9 जागेवर काॅग्रेसने विजय मिळवला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेत भाजपला (BJP) फक्त 3 जागेवरच समाधान मानावे लागले. नागपूर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र त्याठिकाणीच भाजपला हार पत्कारावी लागली आहे. (Nagpur ZP Election)
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
दरम्यान, काँग्रेसच्या सुनील केदार (Sunil Kedar) यांचं वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आल्याची चर्चा आहे. तर, भाजपचं मागील निवडणुकीच्या तुलनेत एका जागेचं नुकसान झालं आहे. मागील निवडणुकीत भाजपने 4 जागेवर विजय मिळवला होता. मात्र, आता केवळ 3 जागेवर विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला एक दणका बसला आहे.
नागपूर जिल्हा परिषद अंतिम निकाल – एकूण जागा – 16
भाजप- 3
शिवसेना- 0
राष्ट्रवादी- 2
काँग्रेस- 9
शेकप – 1
गोंडवाना गणतंत्र पार्टी- 1
इतर- 0
Web Title : Nagpur ZP Election | Big blow to BJP in Devendra Fadnavis and Nitin Gadkari’s district! Congress dominated BJP, congress won 9 seats
HDFC Bank देतंय 10,000 रुपयांची ‘ही’ ऑफर, तात्काळ जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 182 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी
LPG Connection | घरबसल्या करू शकता ‘फ्री एलपीजी गॅस’ कनेक्शनसाठी अर्ज, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?
Pune Crime | भंडारा डोंगराच्या पायथ्याला असलेल्या लॉजमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक
Maharashtra Police | वर्दीत असताना तंबाखू, गुटखा खाऊन कुठेही पिचकाऱ्या मारू नका – पोलिस आयुक्त