नागपूर : बहुजननामा ऑनलाईन- इस्रोच्या विक्रम लँडरबद्दल नागपूर पोलिसांनी मजेदार ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की, “डिअर विक्रम, कृपया रिस्पाँड कर. आम्ही सिग्नल ब्रेक केल्यानंबद्दल तुला दंड आकारणार नाही. यानंतर अनेकांनी मोठ्या संख्येने यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलं आहे की, आम्हाला माहिती आहे नागपूर पोलीस चंद्रावरही आहे.” दुसऱ्याने म्हटले आहे, नियम तर नियम आहे.
https://twitter.com/NagpurPolice/status/1170966490108981248
याआधी इस्रोने रविवारी म्हटलं होतं की, चंद्रयान 2 या मोहिमेत पाठवलेल्या लँडर विक्रमची माहिती मिळाली आहे. शनिवारी इस्रोचा विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला होता. चंद्राचा पृष्ठभाग आणि विक्रम यांच्यात फक्त 2.1 किमी अंतर होते.
https://twitter.com/amey_bhagwat/status/1170967347525345280
नागपूर पोलिसांच्या ट्विटवर एका युजरने म्हटले आहे की, “नागपूर पोलीस, होय, करोडो भारतीयांची भावना विक्रमशी जोडल्या गेल्या आहे. तुमचं ट्विट खूप शानदार आहे.”
https://twitter.com/papalu_/status/1170966906125160448
नुकतेच समजले आहे की, चंद्रयान 2 चा लँडर विक्रमबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्यावरून समजत आहे की विक्रम लँडर सुरक्षित आहे. लँडरची कोणतीही तोडफोड झालेली नाही अशी माहिती आहे. इस्रोच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, लँडर विक्रमसोबत संपर्क साधण्याचा प्रत्येक शक्य तो प्रयत्न केला जात आहे.
That's a real sweet one. Vikram you can't break so many hearts, you would not even know how many shed tears for you. #vikramwakeupdude
— Dil Se Talks with Ashima (@ashimatalks) September 9, 2019
https://twitter.com/elixiron123/status/1170969231703171073
https://twitter.com/GujaratBull/status/1170967467008520192
https://twitter.com/Devansh40238243/status/1170985896633454597