नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – पत्नी घरी नसताना शेजारच्या युवतीला घरात बोलवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला बलात्काराच्या (Rape) आरोपाखाली बुधवारी अटक केली. तक्रार करणारी युवती 19 वर्षांची आहे. आरोपी अमोल शामराव ठाकरे (वय ३१) हा देखील तिच्या शेजारीच राहतो. त्याचा भाजी विक्री चा व्यावसाय आहे.
युवतीच्या तक्रारीनुसार, पत्नी बाहेरगावी गेली की अमोल सदर युवतीला घरात बोलवून तिच्याशी शरीर संबंध ठेवायचा.
१ डिसेंबर २०२० ते १२ एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
त्यानंतर त्यांच्यात भांडणे होण्यास सुरूवात झाली.
या पार्श्वभूमीवर, सदर युवतीने बुधवारी पारडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून अमोल ठाकरे विरुद्ध बलात्काराचा (Rape) आरोप केला आहे.
मात्र, युवतीने बलात्काराची तक्रार नोंदविण्यासाठी एवढा उशीर का केला.
हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
या संबंधाने उलट सुलट चर्चा सुरू आहे.
पोलीस उपनिरीक्षक शरद शिंपणे यांनी युवतीच्या तक्रारीवरुन बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
कृपया हे देखील वाचा:
शरद पवारांनी केलं आरोग्यमंत्री टोपेंचं कौतुक; पक्षांतर करणाऱ्यांचा उल्लेख करत म्हणाले…
खेड पं.स.चे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाला हायकोर्टाकडून स्थगिती
तुमच्याकडे सुद्धा आहे गोल्ड ज्वेलरी तर अशाप्रकारे कमवा जास्त पैसा; जाणून घ्या काय करावे लागेल?
चंदनचोरी सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या 14 वर्षापासून फरार असलेल्या वानवडी पोलिसांकडून अटक