बहुजननामा ऑनलाइन टीम – अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून अत्याचार करणार्या एका आरोपीने लग्नाचा तगादा लावताच तिला विष देऊन जीवे( rape) मारण्याचा प्रयत्न केला. मुलगी शुद्धीवर आल्याने हा घटनेचा धक्कादायक खुलासा झाला. त्यानंतर हिंगणा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सौरभ शंकर कोठाळे (वय २२) असे या आरोपीचे नाव आहे. सौरभ हा हिंगणा तालुक्यातील पेंढरी गावाचा रहिवासी आहे़ त्याच्या जवळच असलेल्या सावळी गावातील एका १७ वर्षाच्या तरुणीबरोबर वर्षापूर्वी सौरभची ओळख झाली होती. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरीक संबंध प्रस्थापित केले. जानेवारी २०२० पासून हा प्रकार सुरु होता. तिच्याबरोबर अनेकदा संबंध केल्यानंतर अलीकडे तो तिला टाळू लागला होता. काही दिवसांपासून तिने सौरभकडे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे सौरभने तिच्यापासून सुटका करुन घेण्यासाठी भलताच कट रचला. सोमवारी ११ जानेवारीला सौरभने खाद्यपदार्थात विष कालवून गोड बोलत ते तिला खाण्यास दिले. खाल्ल्यानंतर तिची प्रकृती खालावली व ती बेशुद्ध पडली. हे पाहून सौरभ पळून गेला. तिच्या नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नाने ती शुद्धीवर आली व तिने पोलिसांना सौरभचे कृत्य कथन केले. पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल व पोक्सो अॅक्ट खाली गुन्हा दाखल करुन सौरभला अटक केली आहे.