बहुजननामा ऑनलाइन टीम –पोटच्या विवाहित मुलीवर दारूच्या नशेत अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधम बापाला मुलीच्या दिराने मारहाण करून त्याची हत्या केली. ही घटना रविवारी रात्री पिपळा हुडकेश्वर भागात घडली. हरिलाल मोहनलाल गोस्वामी (५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी हुडकेश्वर(Murder ) पोलिसांनी आरोपी नितीन नत्थुलाल सोळंकी आणि राजू हरिलाल राठोड यांना ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसानी दिलेली अशी की, मृत हरिलाल हा मूळचा असिनपूर (लखनौ, उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असून त्याच्या बहिणी नागपुरात राहतात. त्यांच्या ओळखीतूनच त्याच्या मुलीचे लग्न नागपुरात झाले होते. ती मानसिकरीत्या कमकुवत असून लॉकडाऊनमध्ये हरिलाल मुलीच्या घरी आला होता. काचेच्या वस्तू बनवून तो विकायचा. हा व्यवसाय चांगला चालत असल्याने तो मुलीच्याच घरी राहू लागला. कालांतराने छोट्याशा घरात अडचण होत असल्याने १५ दिवसांपूर्वी त्याला त्या मुलीच्या कुटुंबीयांनी हुसकावून लावले. त्यामुळे बाजूच्याच एका पडक्या शेडमध्ये तो राहू लागला. तो मुलीलाही तेथे नेत होता. वडील असल्याने सासरच्या लोकांनां संशय घेण्याचे कारण नव्हते. रविवारी वहिनी आणि तिच्या वडिलांना डबा देण्यासाठी मुलीचा दीर नितीन सोळंकी त्याचा मित्र राजू रविवारी रात्री शेडमध्ये आले असता त्यांना हा प्रकार पाहावयास मिळाला.
यावेळी दारूच्या नशेत टुन्न असलेला हरिलाल मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताना दिसला. ती विरोध करीत असल्याचेही नितीनने बघितले. दोघांनी हरिलालची धुलाई सुरू केली. मारहाणीत तो जमिनीवर पडला. खाली दगड असल्याने हरिलालचे डोके ठेचले गेले. तो निपचित पडल्याचे पाहून नितीन आणि राजू निघून गेले. सोमवारी सकाळी हरिलालचा मृतदेह पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले.