Nagpur Crime News | शुल्लक कारणावरून चाकूनं भोसकलं, नंतर दगड-विटांनी मारहाण, अति रक्तस्राव झाल्याने तरुणाचा तडफडून मृत्यू

नागपूर : Nagpur Crime News | धंतोली पोलीस स्टेशनच्या (Dhantoli Police Station) हद्दीत शुल्लक कारणावरून एकाची चाकूने आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. करण नैनीकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. कुणाल राऊत असे मुख्य आरोपीचे नाव आहे. (Murder Of Youth)

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेला करण आणि आरोपी कुणाल हे एकाच ठिकाणी राहतात. दोघांमध्ये काहीना काही कारणांवरून नेहमी वाद होतात. मंगळवार (दि.१४) रात्री दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की या वादामध्ये कुणाल राऊतचे मित्र आणि त्याची पत्नीही सहभागी झाली. या चौघांनी आधी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. नंतर दगड आणि विटांनी त्याला मारहाण केली.

या मारहाणीमध्ये आणि हल्ल्यामध्ये करण गंभीर जखमी झाला. अति रक्तस्त्राव झाल्यामुळे यामध्ये करणचा जीव गेला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे. धंतोली पोलिस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहेत.