बहुजननामा ऑनलाईन टीम – Nagar Pune Highway Accident | नगर- पुणे महामार्गावरील पळवे शिवारानजीक मंगळवारी दोन मालवाहू ट्रक आणि दुचाकींचा भीषण अपघात (Nagar Pune Highway Accident) झाला. यामध्ये ट्रकमधील दोन तर दुचाकीवरील दोन अशा चौघांचा जागेवरच मृत्यू झाला.
राजाभाऊ चव्हाण (वय 50, रा. जातेगाव, ता. गेवराई, जि. बीड) व त्यांचा मुलगा पुरुषोत्तम चव्हाण (वय 18), शुभम राजू देशभ्रतार (वय 24, रा. चमेली, ता. काटोल, जि. नागपूर), राहुल मधुकर डोंगरे (वय 31, रा. सावली. ता. कारंजा, जि. वर्धा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुण्याहून नगरकडे मालट्रक (एमएच 40 वाय 3681) निघाला होता. या ट्रकने पळवे शिवारानजीक थांबलेल्या एका ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली महत्त्वाचे म्हणजे या दोन ट्रकच्यामध्ये दुचाकी (एमएच 21 बीएल 4655) सापडल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ट्रक चालकाने जोरात ब्रेक मारल्याने ट्रकमधील लोखंडी अँगल चालकाच्या केबिनमध्ये घुसून त्यात चालक व क्लीनरचा मृत्यू झाला. अपघात (Nagar Pune Highway Accident) इतका भीषण होता की, घटनास्थळी बघ्यांची गर्दी इतकी झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक नितीन गोकावे (Senior Police Inspector Nitin Gokave) यांनी धाव घेऊन मदतकार्य केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title :- Nagar Pune Highway Accident | father and son with other two killed in road accident on ahmednagar pune highway in parner.
Pune News | पुणे शहराच्या ‘या’ भागात मंगळवारी पाणी बंद रहाणार, बुधवारी उशिरा पण कमी दाबाने पुरवठा
Solapur Crime | करमाळा बलात्कार प्रकरणात मनोहर भोसलेला तब्बल ‘एवढया’ दिवसाची पोलिस कोठडी