नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे २३ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश पदी एन.व्ही. रामन्ना यांची नेमणूक व्हावी अशी शिफारस बोबडे यांनी केली होती त्यावर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरन्यायाधीशपदी एन.व्ही. रामन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.
रामन्ना हे २४ एप्रिलपासून सरन्यायाधीशपदी विराजमान होतील. न्या. रामन्ना हे २६ ऑगस्ट २०२२ ला सेवानिवृत्त होणार आहेत. म्हणजेच त्यांचा कार्यकाळ २ वर्षांहून कमी असणार आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये न्या. शरद बोबडे यांनी सरन्यायाधीश पदी सूत्रे स्वीकारली होती.
आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोच्च न्यायालयाचे नूतन सरन्यायाधीशपदी एन.व्ही. रामन्ना यांच्या नावला मंजूरी दिली आहे. केंद्राने न्यायमूर्ती रामन्ना यांच्या नावाची सरन्यायाधीशपदी घोषणा केल्याने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रथमच देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदावर बसणार आहेत.