पुणे : बहुजननामा ऑनलाईन – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी जेष्ठ समाजसेवक प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यध्यक्षपदी अविनाश पाटील यांच्या निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती जून २०१९ ते मे २०२२ या त्रैवार्षिक कालावधीसाठी असणार आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणी निवड प्रक्रिया नुकतीच भोर येथे पार पडली. यावेळी निवड जाहीर करण्यात आली.
त्रैवार्षिक काळासाठी निवडण्यात आलेल्या उपाध्यक्षांमध्ये साहित्यिक उत्तम कांबळे, महादेवराव भुईभार, प्रा. श्यामराव पाटील, डॉ. सुरेश खुरसाळे यांचा समावेश आहे.
संघटनेचे राज्य प्रधान सचिव म्हणून माधव बावगे (लातूर), सुशीला मुंडे (डोंबिवली), गजेंद्र सुरकार (वर्धा), संजय बनसोडे (इस्लामपूर), नंदकिशोर तळाशिलकर (मुंबई), प्रशांत पोतदार (सातारा) व मिलिंद देशमुख (पुणे) यांची निवड झाली आहे.