MVA Seat Sharing Formula | महाविकास आघाडीचे जागावाटप कधी जाहीर होणार? नाना पटोलेंनी सांगितला मुहूर्त; जाणून घ्या

October 21, 2024

मुंबई: MVA Seat Sharing Formula | आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. महायुतीत जागावाटप अंतिम टप्प्यात (Mahayuti Seat Sharing Formula) असताना भाजपकडून ९९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत अनेक मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून संघर्ष सुरु आहे.

भाजपने ९९ उमेदवारांची यादी घोषित केली असताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा नेमकी कधी होणार? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जागावाटपाबाबत महत्वाचे विधान केले आहे.

नाना पटोले म्हणाले, ” उद्या म्हणजेच २२ ऑक्टोबर रोजी जागावाटप जाहीर केले जाईल. महाविकास आघाडीचं ठरलं आहे. उद्या पहिली यादी येईल. आम्ही तिघे मिळून उद्या संध्याकाळी यादी जाहीर करू”, असे नाना पटोले यांनी म्हंटले आहे.