नवी दिल्ली : वृत्तसंस्था- मोटर व्हेहिकल अॅक्ट 2019 लागू झाल्यानंतर लोकांनी वाहतून नियम पाळण्यास सुरुवात केली आहे. पॉल्यूशन कंट्रोल ते ड्रायव्हींग लायसंस आणि इंश्योरंस, ज्याच्या गाडीत जी कमी होती लोक त्याला ठिक करण्यात लागले आहेत. यातच हेल्मेटच्या विक्रीतही वाढ झाली आहे. असा नियम आहे की, दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट घालणं अनिवार्य आहे.
सध्या असे समोर आले आहे की, दुचाकीवर बसलेला आणि दुचाकी चालवत असलेला व्यक्ती मजबूत आणि आयएसआय मार्कवालं हेल्मेट घालत आहे परंतु मागे बसणारा व्यक्ती साधं हेल्मेट घालत आहे. वाहतूक नियमानुसार मागे बसणाऱ्या व्यक्तीला दंड आकारला जाऊ शकतो. याशिवाय त्याला पुन्हा असे हेल्मेट न वापरण्यासाठी सूचना दिली जाऊ शकते.
एका रिपोर्टनुसार, ट्राफिक अधिकाऱ्यांना असे आढळत आहे की, दुचाकीवरील दोघांपैकी एकाकडे साधं हेल्मेट आहे ज्याची क्वालिटी हलकी आहे. रिपोर्टनुसार, लोक हे हेल्मेट यासाठी खरेदी करत आहेत कारण हे स्वस्त आहेत. मजबूत हेल्मेटच्या तुलनेत हे 300 रुपयांच्या आतच मिळते. दुचाकीवर महिला असो वा पुरुष दोघांनाही मजबूत आणि आयएसआय मार्कवालं हेल्मेट घालण्यासाठी सांगतिलं जातं.