नवी दिल्ली : वृत्तसंस्था- विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी प्रोफेसर डॉ. शीतल प्रसाद याच्या रासलीला मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. हि घटना समोर आल्यानंतर या प्रोफेसरला अटक करण्यात आल्यानंतर आता अनेक पीडित मुली समोर येत आहेत. त्याचबरोबर समाजातून देखील त्याला कडक शिक्षा होण्याची मागणी समोर येत असून या मुलींमुळे त्याच्या पापी कृत्यांचा पर्दाफाश झाला आहे. एक वृत्तसंस्थेने मुजफ्फरपूरच्या ‘पापी प्रोफेसर’ शीतल प्रसाद यांचे दुष्कर्म उघड केले.
त्याला तुरूंगात पाठवल्यानंतर, त्या मुली एका वृत्तसंस्थेच्या समोरही आल्या आहेत, ज्यांनी पडद्याआड असताना केवळ पीडितेलाच मदत केली नाही तर क्रूर गुरु घंटल यांनाही तुरुंगात पाठवलं. या धाडसी मुली मुजफ्फरपुरात पत्रकारितेचा अभ्यास करीत आहेत पीडित मुली या मुलींच्या मैत्रिणी आहेत. त्यांनी अनेक धक्कादायक गोष्टी देखील सांगितल्या आहेत. हा नराधम प्रोफेसर प्रत्येक मुलीला आपल्या कृत्याची शिकार बनवत असे.
काही मुली त्याला वैतागून शिक्षण सोडून देत असता मात्र काहीजणी हा त्रास सहन करत असतं. जेव्हा या मुलींच्या शौर्याची कहाणी महाविद्यालयात पोहोचली तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून मुलींचे कौतुक केले. त्याचबरोबर एसएसपी जयंतकांत यांनीही हे स्पष्ट केले आहे की आरोपी कितीही दोषी ठरले तरी विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणार्यांना वाचवले जाणार नाही.
Visit : bahujannama.com