लासलगाव : बहुजननामा ऑनलाईन – लासलगाव शहरासह लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३८ गावातील मुस्लिम बांधवांनी कोरोना बरोबर लढण्याकरिता चांगल्या लॉकडाउनचे पालन करण्याची आवश्यकता आहे. रमजान ईदसारख्या पवित्र उत्सवाला एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाज पठण करून प्रशासनाला सहकार्य करावे व लॉकडाउन चे सर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाचा मुकाबला करण्यास आपले महत्त्वाचे योगदान द्यावे असे प्रतिपादन लासलगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले.
लासलगाव येथे पोलीस प्रशासनामार्फत रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३८ गावाच्या मुस्लिम समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. रमजान ईद सारखा पवित्र उत्सव असताना या वर्षी पुन्हा कोरोनाचे संकट आले आहे. रमजान ईद साजरी करताना सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या धोक्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा त्रास सर्वांनाच होणार आहे त्यामुळे पूर्ण प्रतिबंध करून गालबोट लागेल अशी कोणतीही गोष्ट होता कामा नये याकडे मुस्लिम बांधवांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे राहुल वाघ यांनी या वेळी सांगितले
या वेळी पत्रकार हारून शेख,जामा मस्जिद चे मौलाना महेमुद रजा अमजदी,नुरानी मस्जिद चे मौलाना मंजूर अहमद मिल्ली,हाफिज तौफिक शेख,विंचूर ग्रामपंचायत सदस्य इस्माईल मोमीन,अनिस शेख चांदवडकर,हसन शेख,पिंपळगाव नजीक ग्रामपंचायत सदस्य लतीफ तांबोळी,गुलामरसूल रंगरेज,वसीम मोमीन,शौकत शेख,शमसुद्दीन कादरी,ज्ञानेश्वर मोकाटे,विलास काळे या सह लासलगाव,टाकळी,विंचूर,गोंदेगाव,