लखनऊ : वृत्तसंस्था – योगी सरकारच्या काळात लव जिहादच्या घटना कमी होत नाहीत. ताजं प्रकरण समोर आलं आहे जे बारादरी भागातील आहे. जिथे एका मुस्लिम मुलाने नाव बदलून एका दलित अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यासोबत अनेक वाईट कृत्ये केले. एवढ्यावर तो तरूण थांबला नाही तर त्याने याचे अश्लील व्हिडीओज बनवून तिला ब्लॅकमेल करणं सुरु केलं. किशोरी असं या मुलीचं नाव आहे.
14 वर्षांच्या रेप पीडितेचा आरोप आहे की, ती ब्युटी पार्लरमध्ये काम करते. रोज ती ऑटोने ये जा करायची. यावेळी तिची ओळख एका मुलाशी झाली. त्याने तिला आपले नाव अमन सांगितले. अमनने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अमन हातात कलावा आणि कडंही घालत होता. एकदा तो किशोरी सोबत मंदिरातही गेला. त्याने किशोरीसोबत अनेक दुष्कृत्य केले. यानंतर तिची तिचे अश्लील क्लिपींग केले.
किशोरीला एका मैत्रिणीकडून समजले की, तो अमन नाही तर खालिद आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने खालिदला भेटणे बंद केले. यानंतर खालिदने तिला अश्लील व्हिडीओज सोशलवर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणं सुरु केलं. तिची इच्छा आहे की, खालिदला शिक्षा व्हावी.
किशोरीच्या आईचं म्हणणं आहे की, खालिदने तिच्या मुलीला फसवून रेप केला आणि त्याचे अश्लील व्हिडीओ बनवले. तिचं म्हणणं आहे की, किशोरीची इच्छा आहे की, पोलिसांनी खालिदला अटक करावी. 4 ऑगस्ट रोजी खालिद दुसऱ्या मुलीशी लग्न करणार आहे. त्यामुळे पीडितेची अशी इच्छा आहे की, आता त्याने आणखी कोणाचं आयुष्य बरबाद करू नये.”
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंदू संघटनेचे लोक पीडिता किशोरीला बारादरी पोलील ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी एफआयर दाखल न केल्याने नेत्याची आणि पोलिसांची शाब्दिक चकमक झाली. हिंदू नेत्याचं म्हणणं आहे की, मुस्लिम मुलं कलावा बांधून कॉलेजच्या आसपास फिरत असतात. हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव जिहाद करतात. त्यांचं म्हणणं आहे की, बरेलीमधूनही असे अनेक प्रकार समोर आले आहेत. पोलिसांनी यावर कठोर कारवाई करावी अशी त्यांची इच्छा आहे.
यानंतर याप्रकरणी बारादरी पोलीस ठाण्यात पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर आरोपी खालिदविरोधात गंभीर कलमांनुसार खटला दाखल करण्यात आला आहे. एसपी सिटी अभिनंदन यांनी सांगितले की, आरोपीविरोधात आयपीसीमधील कलम 376, 363, 323, पॉक्सो आणि एससीएसटी अॅक्टनुसार, खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. परंतु आरोपी फरार आहे. याआधीही येथून अनेक लव जिहादच्या घटना समोर आल्या आहेत.