जंजिरा : बहुजननामा ऑनलाइन – कोकणामधील (Konkan) रायगड जिल्ह्यात (Raigad) असणारा जलदुर्ग म्हणजे मुरूडचा जंजिरा (Murud Janjira). हा जंजिरा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक आहे. अनेक पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जंजिऱ्यावर कायम मोठी गर्दी असते. मात्र सोमवार ३० मे पासून पुढे तीन महिने तो बंद ठेवला जाणार आहे. पावसाळ्याच्या (Monsoon) पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जात असून तीन महिने जंजिरा जलदुर्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. (Murud Janjira)
आगामी पावसाळ्याचे दिवस व समुद्राच्या लाटांचा बदललेला वेग यामुळे या किल्ल्यावर पोहोचणे धोक्याचे ठरू शकते. हा धोका पर्यटकांसोबतच व्यावसायिक, जहाज व्यवसायिक व गाईड करणाऱ्यांच्या जीवाला देखील असल्याने किल्ला पूर्णपणे बंद केला आहे. दर वर्षी हा किल्ला पावसाळ्यात पाहण्यासाठी बंद ठेवला जातो. या वर्षीदेखील किल्ला सोमवारी ३० मे पासून बंद राहणार असून तीन महिन्यानंतर पुन्हा सप्टेंबर (September) महिन्यात जलदुर्ग (Jaldurg) पाहण्यासाठी पर्यटकांना खुला होईल. रायगड जिल्हा प्रशासनाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या २६ मे पासूनच हा किल्ला बंद ठेवला जाणार होता पण, शनिवार-रविवार (Weekend) सुट्टी आल्यामुळे पर्यटकांची (Tourists) मोठी गर्दी झाली होती. मात्र या सर्वांना बाहेरूनच या किल्ल्याचे दर्शन घेऊन अनेकांना परत फिरावे लागले. जलदुर्ग असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या दारापर्यंत फक्त शिडाच्या होड्या (Boats) जातात. पावसामुळे समुद्राचा (Sea) प्रवाह वाढतो. समुद्राच्या पाण्याचा बदललेला प्रचंड वेगामुळे शिडाच्या बोटी हेलकावे घेतात व अशारितीने किल्ल्यावर जाणे धोकादायक होते. नागरिकांच्या सुरक्षिततेमुळेच प्रशासनाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या किल्ल्यावर जाण्यासाठी कायमस्वरूपीचा रस्ता (Roads) किंवा पुलाची (Bridge) सोय व्हावी असा
प्रस्तावही मेरीटाईम बोर्डाकडून (Maritime Board) देण्यात आला होता.
मात्र पुरातत्व खात्याने (Department of Archaeology) जलदुर्गाचे महत्व कमी होईल म्हणून प्रस्ताव नाकारला.
ही ऐतिहासिक वास्तू असल्याने हजारोंच्या संख्येने लोक येत असतात.
मात्र पुढील तीन महिने पर्यटकांना किल्ला बघता येणार नाही. (Murud Janjira)
Web Title : Murud Janjira | If you are planning to see the chain of Murud, do you know this decision of the administration?
- Pune Guardian Minister Chandrakant Patil | रोटरी तर्फे महिला उत्पादकांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी – चंद्रकांत पाटील
- Devendra Fadnavis | ‘सावरकर बनण्याची तुमची औकात नाही’, देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर घणाघाती टीका (व्हिडिओ)
- MP Supriya Sule | रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांसाठी खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखर होऊन धावल्या; बंद पडलेल्या शिवशाहीतील प्रवाशांना स्वतःच्या गाडीसह अन्य गाड्यांतून सावलीत हलवले (Video)