पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात पतीने फरशीचा तुकडा मारुन तिचा खुन केला. ही घटना भोसरी येथील गुळवे वस्तीमध्ये सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी अतिश कोंडीराम काळे (वय ३५, रा. बालाजीनगर, भोसरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कावेरी विशाल खवळे ऊर्फ कावेरी अतिश काळे (वय ३०) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी तिचा भाऊ संतोष सर्जेराव देठे (वय ३२, रा़ जगतापनगर, थेरगाव) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, कावेरी आणि अतिश काळे हे पती पत्नी होते. अतिश कावेरीच्या चारित्र्याचा संशय घेत असे. त्यावरुन यापूर्वी त्यांच्यात भांडणे झाली होती. कावेरी या सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता भोसरीतील गुळवे वस्ती येथे गेल्या होत्या. हे समजल्यावर अतिशही तेथे गेले. संजय हिरामण लांडे यांची रुम नं ५ चे समोर त्याने कावेरी यांच्या डोक्यात फरशीचा मोठा तुकडा मारुन तिला गंभीर जखमी केले. त्यात तिचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Visit : bahujannama.com