बहुजननामा ऑनलाइन टीम – Munmun Dutta Dance Video | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ulta Chashma)’ मधील बबीताजी म्हणजेच मुनमुन दत्ता. या कार्यक्रमांमधून मुनमुन दत्ता (Munmun Dutta Dance Video) प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. तर बबिताजी या पात्रानं तिनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. नुकतंच बबितानं (Babita ji) सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
मुनमुन दत्तानं एकॉनच्या (Akon) ‘हे लेडीज (Hay Ladies)’ या गाण्यावर डान्स केला असून, तिचा हा डान्स जेठालाल (Jethalal) सुद्धा दंग होतील. शेअर केलेला व्हिडिओ मध्ये तिनं रंगीत टॉप आणि शॉर्ट्स घातली आहे. या व्हिडिओमध्ये (Munmun Dutta Dance Video) ती डान्स करताना दिसत असून, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन एकदम ग्लॅमरस आहेत.
दरम्यान, बबिताच्या या व्हिडिओला अगदी कमी वेळात लाखोंमध्ये लाईक्स आले आहेत. चाहत्यांनी कमेंट करून बबीताचं चांगलंच कौतुक केलं आहे. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘तुमच्या सारखं कोणीच नाही, बबिता जी.’ जवळपास एका दिवसात या व्हिडिओला तब्बल 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
web title : Munmun Dutta Dance Video | taarak mehta ka ooltah chashmah babita ji dance on hey baby jethalal gets shock.