Mundhwa Pune Crime News | मराठी भाषेच्या अज्ञानामुळे तरुणीची फसवणूक ! संमतीपत्र सांगून कुलमुख्य्त्यार पत्रावर घेतली सही, 1 कोटींच्या मालमत्तेचा केला व्यवहार
पुणे : Mundhwa Pune Crime News | तरुणीला मराठी भाषा येत नसल्याचा गैरफायदा घेऊन तिघांनी मराठी भाषेतून पत्र तयार केले. पत्र व्यवहार करण्यासाठी संमतीपत्र असल्याचे सांगून कुलमुख्त्यार पत्रावर सही करुन १ कोटी रुपयांच्या मिळकतीचा व्यवहार करुन फसवणूक केली. (Cheating Fraud Case)
याबाबत घोरपडी गावातील एका २७ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तुषार हिम्मत कवडे (रा. श्रीनाथनगर, घोरपडी), पॉल पिटर फ्लेरो (रा. घोरपडी) आणि सुरेश त्रिंबक पाळवदे (रा. थिटेवस्ती, खराडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार २४ एप्रिल ते ऑगस्ट २०२४ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगनमत करुन फिर्यादीच्या मिळकतीचा व्यवहार करुन देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. फिर्यादी यांचा मराठी भाषेविषयी असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन, दिशाभूल करुन पत्रव्यवहार करण्यासाठी संमतीपत्र घेतो, असे सांगून कुलमुख्त्यार पत्र घेतले. फिर्यादीच्या मालकीची घोरपडीतील अंदाजे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमत असलेली मिळकत हिचे बनावट दस्त बनविला. त्यावर फिर्यादी यांचा कुलमुख्त्यार पत्रावरील फोटोवरुन कलर फोटो काढला. बनावट सही व अंगठा करुन या मिळकतीचा व्यवहार केला. त्याचा कोणताही लाभ फिर्यादीला न देता फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.
Comments are closed.