लातूर : बहुजननामा ऑनलाईन- लातूर शहरातील ४० वर्ष जुन्या असलेल्या ग्रेन मार्केट मधील बुद्धगया विहार तोडल्याच्या निषेधार्थ बौद्ध कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन केले. गेल्या १४ दिवसापासून आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाकडे जातीयवादी महानगरपालिका प्रशासन जाणून -बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी जुन्या ग्रेन मार्केट येथील बुद्धगया विहार लातूर महानगरपालिका बुलडोझरने उद्वस्त केले. त्याच्या निषेधार्थ मनपाच्या प्रवेशद्वारादरम्यान गेल्या १४ दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन तीव्र करण्याच्या उद्देशाने मुंडन आंदोलन करण्यात आले.
यावेळी देविदास सुरवसे ,अविनाश सरकळे ,राजू पवार ,गोरख जिडे यांनी मुंडन करून महानगरपालिकेचा निषेध व्यक्त केला.