मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – 1993 मध्ये झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणी तपास यंत्रणांना आता यश आले. दहशतवादी मुनाफ हलारी मूसा (Munaf Halari Moosa) याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. मुनाफ हलारी याला गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तो पाकिस्तानच्या पासपोर्टवर प्रवास करत होता.
Gujarat Anti-Terrorism Squad (ATS): Munaf Halari Moosa arrested by ATS from Mumbai Airport, he was involved in drug trafficking worth Rs 1,500 crores, which was busted last year. He is also an accused in 1993 Mumbai bomb blasts.
— ANI (@ANI) February 10, 2020
सूत्रांच्या माहितीनुसार, मुनाफ हलारी हे 1993 मध्ये झवेरी बाजारात झालेल्या स्फोट प्रकरणातील आरोपी होता. तपास संस्था बर्याच दिवसांपासून याचा शोध घेत होती. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार मुनाफ हलारी हा महाराष्ट्रातील आहे. मुंबई बॉम्बस्फोटासाठी त्याने तीन स्कूटर दिले होते असे म्हणतात. झवेरी बाजारात स्कूटरचा स्फोट झाला. मुंबईतील निगम क्रॉस रोड आणि दादर येथे हे दोन्ही स्कूटर सापडले होते.
२ तासात १२ बॉम्बस्फोट आणि हादरली होती मुंबई
12 मार्च 1993 रोजी मुंबईत अवघ्या दोन तासांतच 12 वेगवेगळ्या ठिकाणी 12 स्फोट झाले या स्फोटांनी मुंबई हादरली. या स्फोटांमध्ये 257 लोक ठार झाले, तर असंख्य लोक जखमी झाले. 19 नोव्हेंबर 1993 रोजी हा खटला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आला.या खटल्याची सुनावणी 19 एप्रिल 1995 रोजी मुंबईच्या टाडा कोर्टात सुरू झाली. पुढील दोन महिन्यांत आरोपींविरोधात आरोप निश्चित केले गेले. मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला यापूर्वीच फाशी देण्यात आली आहे. मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम अद्याप पकडला गेला नाही.