वसई बहुजननामा : पाय बांधून ,अंगावर उकळतं तेल ओतून , डोळ्यात मिरची पूड टाकत डोक्यावर हातोडीने वार करून निर्घुण हत्या करण्याचा प्रयत्न एका पत्नीने आपल्या पतीवर केला आहे. आपल्या मित्राच्या साहाय्याने महिलेने आपल्या पतीवर हा प्राणघातक हल्ला करण्याचा हा क्रूर प्रयत्न केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. भविष्य भू – हागोहा असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी क्विन्सीया भू – हागोहा आणि तिचा मित्र सतवीर नायक अटक केली आहे. भविष्य याला मुंबईच्या जेजे रुग्णालयात हलविण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
वसईच्या उमेळमान परिसरातील प्रतापगड वसाहतीत हि घटना घडली. कौटुंबिक वादातून क्विन्सीया हिनं हा प्रकार केला . तिने आपल्या पतिला मारहाण करत , त्याच्या डोळ्यात आणि अंगावर उकळत तेल ओतलं , हातोडीने त्याच्या डोक्यावर मारले तसेच घरातील मिळेल त्या वस्तूने तिने भविष्य याला मारहाण केली आणि त्याच्या पायाला बांधून त्याला टॉयलेट मध्ये डांबून ठेवलं.
जखमी झालेल्या भविष्य ने मदतीसाठी प्रेशर कुकर आणि घरातील स्पीकर किचनच्या खिडकीतून बाहेर फेकले. आवाज ऐकू येताच आसपासचे शेजारी रूम मध्ये आले आणि पोलिसांना बोलावले. हि घटना घडताना त्यांची दोन जुळी मुलंदेखील घरातचं होती. भविष्य यांने केलेल्या आरोपानुसार क्विन्सीया आणि तिच्या प्रियकरानं हे कृत्य केलं. परंतु क्विन्सीया हिने पोलिसांना सतवीत हा आपला मित्र असल्याचे सांगितले. तर क्विन्सीयाच्या आईवडीलांनी भविष्य आपल्या मुलीला मारहाण करत होता, असं सांगितले. भविष्य हा मूळचा आसामचा रहिवासी आहे. क्विन्सीया आणि भविष्य यांनी आंतरजातीय विवाह केला होता. भविष्य हा मुंबईमधील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. ते उमेलमान परिसरात भाड्याने राहत होते. त्यांना दोन जुळी मुलं देखील आहेत.