बहुजननामा ऑनलाइन टीम : महाराष्ट्रातील उद्धव सरकारने अनेक नामांकित सेलिब्रिटींच्या संरक्षणाची पातळी बदलली आहे. राज्य सरकारने आदित्य ठाकरे आणि अण्णा हजारे यांची सुरक्षा Y + वरून Z श्रेणीत वाढविली आहे. त्याचबरोबर माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. तथापि, बाहेर पडताना त्यांना सुरक्षा पुरविली जाईल. या दोघांनाही एक्स श्रेणी सुरक्षा देण्यात आली होती.
भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची Y सुरक्षा हटवण्यात आली आहे आणि माजी राज्यपाल असलेल्या राम नाईक यांची Z+ सुरक्षा कमी करून एक्स श्रेणीची करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना Z + श्रेणीची सुरक्षा आणि अजित पवार यांची Z सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त उज्ज्वल निकम, नारायण राणे, आशीष शेलार आणि प्रसाद लाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या स्टेट थ्रेट परसेप्शन समितीने याबाबतचे निर्णय घेतले आहेत.
थ्रेट परसेप्शन समितीच्या बैठकीसाठी हे अधिकारी उपस्थित
थ्रेट परसेप्शन समितीच्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, DGP सुबोध कुमार जयस्वाल, महाराष्ट्र गुप्तचर विभाग आयुक्त रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस कमिश्नर संजय बर्वे उपस्थित होते. समितीने ९७ जणांच्या नावाबाबत विचार केला होता ज्यामध्ये नेता, खेळाडू आणि कलाकारांचा समावेश होता. या नावांवर विचार करून नंतर हा निर्णय घेण्यात आला.
Visit : bahujannama.com