मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai Suicide News । आखाती देशातील दुबई येथून मुंबईमध्ये परत आलेल्या युवतीने विलगीकरण (quarntine) केलेल्या हॉटेलमध्येच गळफास लावून आत्महत्या (Suicide) केलीय. अशी धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. ही घटना 6 मार्च रोजी घडली होती. यावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MIDC Police Station) (Mumbai Airport) दिलेल्या फिर्यादीवरून प्रियकर आणि त्याची पत्नी दोघांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला गेला आहे. यावरून पोलीस अधिक तपास करीत आहे. तसेच अजून देखील कोणाला अटक करण्यात आली नाही.
अधिक माहितीनुसार, मृत संजली सिंग (Sanjali Singh) असं आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुणीचे नाव आहे. 3 मार्चला दुबईवरून मुंबई विमानतळावर आली होती. त्यानंतर तिला काही दिवसांसाठी लीला रेसिडेन्सी चकाला अंधेरी या हॉटेलमध्ये क्वारंटाइनसाठी ठेवले होते. तसेच, त्या तरुणीने 6 मार्च रोजी संध्याकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्येच गळफास लावून आत्महत्या केलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये (MIDC Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. पण, याप्रकरणी संजलीची आई ज्योती सिंग यांनी आपल्या मुलीचा प्रियकर अमन सिंग वर्मा आणि त्याची पत्नी संगीता वर्मा या दोघांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मृतक मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस आत्महेत्याला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
संजली सिंगचे (Sanjali Singh) अमन सिंग वर्मा सोबत प्रेमसंबंध होते.
संजलीच्या आईने सांगितलं की, अमन संजलीला आणण्यासाठी विमानतळावर देखील गेला होता.
संजली हॉटेलमध्ये असताना अमनच्या पत्नीने तिला फोन केला आणि जोरदार खडसावले.
म्हणून अमन विवाहित असल्याचे संजलीला लक्षात आले.
यांनतर दोन दिवसांनी संजलीने हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
web title: Mumbai Crime News. A young woman returning from Dubai committed suicide by hanging herself in a hotel, complaining against her boyfriend and his wife.
Modi Cabinet Expansion | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा, आता हेल्थ मिनीस्टर कोण?
Dilip Kumar |दिलीप कुमार- सायरा बानो यांना कायम सतावत राहिली एक खंत; जाणून घ्या
Gold Rate Today । 9,000 रुपयांनी स्वस्त झालेल्या सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर