मुंंबई (Mumbai ): बहुजननामा ऑनलाईन (Bahujannama online) – Mumbai Rains | गोवंडी भागातील शिवाजीनगर येथील घर कोसळून झालेल्या अपघातात एका ८० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकासह २ महिलेचा मृत्यु झाला आहे. (Mumbai Rains) घराची भिंत कोसळल्याने त्यात ८ जण जखमी झाले आहेत. नेहा परवेझ शेख (वय ३५), आणि मोकर जाबीर शेख (वय ८०), शमशाद शेख (वय ४५) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत.
गोवंडी भागातील बॉम्बे सिटी हॉस्पिटलजवळील एक मजली घर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कोसळले. त्याखाली १० जण दबले गेले होते. याची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावून गेले. त्यांनी घराचा मलबा बाजूला करुन सर्वांना राजावाडी हॉस्पिटल, सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यातील तिघांचा मृत्यु झाला आहे.
परवेझ शेख (वय ५०), अमिनाबी शेख (वय ६०), अमोल धाडेई (वय ३८), समोल सिंग (वय २५), फैजेल कुरेशी (वय २१), नमरा कुरेशी (वय १७), शाहिना कुरेशी (वय २६) हे जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
Rain in Maharashtra | महाबळेश्वरात २ दिवसात 980 मिमी पाऊस ! तुळशी धरण क्षेत्रात राज्यातील दुसर्या क्रमांकाचा विक्रमी 895 मिमी पाऊस